आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागच्या वर्षी शिखराच्या 100 मीटर जवळून मागे परतावे लागले, यंदा जिद्दीने सर केला एव्हरेस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मनात जिद्द, प्रचंड इच्छाशक्ती, चिकाटी असेल तर काेणतीही गाेष्ट अशक्य नसते याची प्रचिती पुण्यातील एलअायसीत विकास अधिकारी (डीअाे) पदावर काम करणाऱ्या एका तरुण गिर्याराेहकाने गुरुवारी करून दिली अाहे.  २०१७ च्या एव्हरेस्ट माेहिमेत चढाईच्या अंतिम टप्प्यावर असताना तसेच शिखरमाथा अवघ्या १०० मीटर अंतरावर असताना वादळी वाऱ्यामुळे त्याला परत फिरावे लागले होते.

 

मात्र, जिद्द व कर्तृत्वावर ठाम असलेल्या भगवान चवले नामक या गिर्याराेहकाने पुन्हा वर्षभर डाेंगरदऱ्या फिरत, अार्थिक निधीची जमवाजमव करून गुरुवारी जगातील सर्वाधिक उंचीचे एव्हरेस्ट शिखर सर केले अाहे.  सर्वाेच्च शिखर एव्हरेस्टसमाेर नतमस्तक व्हावे, अशी अनेक गिर्याराेहकांची इच्छा असते. मात्र, अार्थिक निधीची उभारणी, जिद्द, प्रचंड कष्ट करण्याची तयारी, वेगवेगळ्या हवामानात तग धरणारी शारीरिक तंदुरुस्ती या गाेष्टींनाही महत्त्व दिले जाते.

 

त्यामुळे जे स्वप्न उराशी बाळगले ते पूर्ण करण्याकरिता तन-मन-धनपूर्वक प्रयत्न करावे लागतात, असे भगवानने एव्हरेस्ट माेहिमेस जाण्यापूर्वी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले होेते. अातापर्यंत हिमालयातील अायलंड शिखर (नेपाळ), भागीरथी-2, घाेलप, कांग्री, स्टाेक कांग्री ही अतिउंच शिखरे भगवान याने यशस्वीरीत्या पार केली अाहेत. त्यासाेबतच सह्याद्रीतील खडापारशी, वजीर, नागफणी, लिंगाणा, तैलबैला या चढाईस अवघड सुळक्यांवर यशस्वी चढाई केली अाहे.  

 

 

निधी गाेळा करण्यासाठी विविध ट्रेक्सचे अायाेजन   
भगवान चवलेला एव्हरेस्ट माेहिमेसाठी २६ लाख रुपये निधीची अावश्यकता हाेती. याकरिता त्याने सह्याद्रीच्या डाेंगररांगात फिरत सराव केला. मात्र, त्याचसाेबत माेठा निधी उभारणीकरिता मुला-मुलींसाठी छाेटे-माेठे ट्रेक, रॅपलिंग करून त्याद्वारे पैशाची जमवाजमव केली. विविध संस्था, व्यक्ती यांच्याशी संपर्क लाधून त्यांना प्रत्यक्ष दिवस-रात्र भेटून मदत गाेळा केली.

 

चाेमोलुंगमा देवतेला पुन्हा भेटीचे दिले हाेते वचन  
मागच्या वर्षी दृष्टिपथात असलेली मोहीम परत घ्यावी लागली. तेथून परतत असतानाच चाेमाेलुंगमा (एव्हरेस्ट) देवतेला वचन दिले हाेते की, पुढील वर्षी पुन्हा येताेय, तुझे दर्शन झालेच पाहिजे. त्याची वचनपूर्ती झाली.

-भगवान चवले, एव्हरेस्टवीर  

 

पुढील स्लाइडवर पाहा चवले यांचे एव्हरेस्टवर चढाई करतानाचे काही फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...