आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Controversy ज्ञानोबा, तुकोबांपेक्षा मनू एक पाऊल पुढे होता, संभाजी भिडेंचे नवे वादग्रस्त वक्तव्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - आंब्याच्या वक्तव्याने झालेल्या वादानंतर आता संभाजी भिडे यांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे. या वक्तव्यामध्ये भिडे यांनी ज्ञानोबा आणि तुकोबा माऊलींची तुलना थेट मनूबरोबर केली. ज्ञानोबा माऊली तुकाराम.. च्या गजरात वारीला निघालेल्या भिडे यांना या वारीतच ज्ञानोबा, तुकोबांपेक्षा मनू एक पाऊल पुढे होता, असे म्हणून त्यांचा अपमान केल्याचा प्रकार घडला. 


काय म्हणाले भिडे...
भिडे यांनी मनुस्मृतीतील काही वचनांचा उल्लेख यावेळी बोलताना केला. भिडे म्हणाले, माणसे पशू बनत आहेत. पण त्यांना पशूपेक्षा वेगळा ठेवतो तो धर्म. कारण पशू धर्माचे आचरण करत नाही. स्वतःला ओळखण्याची शक्ती देवाने मानवाला दिली आहे. धर्माच्या आचरणाच्या माध्यमातून मनावर नियंत्रण मिळवता येते. ज्ञानोबा आणि  तुकारामांनी आपल्याचा तो मार्ग दाखवला आहे. पण मनू, हा त्यांच्या पेक्षा एक पाऊल पुढे होता. 

 

बातम्या आणखी आहेत...