आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साता-यातील \'त्या\' भोंदूबाबाचा आणखी एका महिलेवर 2008 पासून बलात्कार, गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- साता-यातील भोंदूबाबा हैदर अली शेख याने जादूटोण्याची भीती घालून आणखी एका महिलेवर बलात्कार केल्याचे समोर आले. आजारी असलेल्या महिलेला भूतबाधा झाल्याचे सांगून सांगलीतील मिरज येथील महिलेवर 2008 पासून हा नराधम तिच्यावर बलात्कार करत होता. विशेष म्हणजे बलात्कार करतानाचे व्हिडिओ सुद्धा त्याने मोबाईलवर काढला होता. पुढे धमकी देऊन संबंधित महिलेला पतीपासून घटस्फोट घ्यायला भाग पाडले व तिच्याकडील 30 तोळे सोनेही लंपास केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. संबंधित हैदर अली शेख हा भोंदूबाबा पुण्यातील एका 40 वर्षीय महिला व तिच्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तुरूंगाची हवा खात आहे. काय आहे प्रकरण....

 

- याबाबतची माहिती अशी की, 38 वर्षीय तक्रारदार महिला मूळची सातारची असून, सांगलीतील मिरज येथील व्यक्तीशी 1996 साली विवाह झाला होता. 
- मात्र, महिलेला दोन मुले झाल्यानंतर 2007 साली ती आजारी पडली होती. अनेक वेळा दवाखान्यात गेल्यानंतरही फरक पडत नसल्याने महिलेच्या भावाने तिला हैदर अली शेखकडे दाखवले होते.
- हैदर अलीने त्यावेळी महिलेला व तिच्या भावाला हिला भूतबाधा झाल्याचे सांगितले. तसेच ही भूतबाधा दूर करण्यासाठी दोन दिवस तंत्र-मंत्र करावे लागतील असे सांगितले.
- त्यानुसार, महिला व तिचे नातेवाईक तंत्र-मंत्र करण्यासाठी गेले असता तिला माझ्याकडे एकटी सोडा व तुम्ही घरी निघून जा असे सांगितले.
- यानंतर भोंदूबाबाने महिलेला गुंगीचे औषध देऊन विवस्त्र करत बलात्कार केला व मोबाईलमध्ये शुटिंग केले.
- महिला शुद्धीवर आल्यावर याबाबत वाच्यता न करण्यास सांगितले. तसेच मोबाईलमधील शुटिंग दाखवून जीवे मारण्याची व सर्वांना ते दाखविण्याची धमकी दिली.
- यानंतर संबंधित महिलेला व तिच्या पतीला सांगलीतील मिरज शहर सोडून सातारा येथे राहण्यास सांगितले.
- या काळात त्याने महिलेच्या पतीचा व तिच्या भावाचा विश्वास संपादन केला.
- त्यामुळे गुरूवार पेठेतच म्हणजे हैदर अली शेखच्या घराशेजारीच संबंधित महिलेला व तिच्या पतीला राहायला घर दिले.
- पुढे नंतरच्या काळात महिला व तिच्या पतीत भांडणे लावली व दोघांना तलाक घ्यायला भाग पाडले.
- महिलेने तलाक घेतल्यानंतर महिलेला त्याच्याच इमारतीतील वरच्या मजल्यावर राहायला जागा दिली.
- त्यानंतर तिच्याकडील 30 तोळं सोनं काढून घेतले.
- काही दिवसापूर्वी हैदर अली शेख याला पुण्यातील एकाच कुटुंबांतील सासू, सून व तिच्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
- त्यामुळे साता-यातील या महिलेने सुद्धा हिंमत दाखवून सातारा पोलिस ठाण्यात धाव घेत त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भोंदूबाबा हैदर अली शेखविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 

हैदर अली शेखचा प्रताप वाचायचा असेल तर हे ही वाचा.....भूत उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा व्यावसायिक कुटुंबातील सासू-सुनेवर बलात्कार