आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Accident: टँकर-दुचाकीचा भीषण अपघात, पिंपरी-चिंचवडमध्‍ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड - रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला टँकरची धडक बसल्याने त्‍याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना पिंपरी-चिंचवड परिसरातील भोसरी येथे आज (सोमवारी) सकाळी 11 वाजण्‍याच्‍या सुमारास घडली. घटनेनंतर टँकर चालक फरार झाला आहे. 

 

तुकाराम रंगनाथ झपके व(55) असे मृत व्‍यक्‍तीचे नाव आहे. ते गणेश नगर, बोपखेल येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी भोसरी पोलीस स्‍टेशनमध्‍ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी परिसरातील धावडे वस्ती येथे टँकर ( MH 12 FZ 8294) आणि दुचाकी ( MH 14 EX 4880)  यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये दुचाकी चालक तुकाराम रंगनाथ झपके यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीस्वार रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला. टँकरची दुचाकीला समोरून धडक बसली. घटनेनंतर टँकर चालक फरार झाला असून स्थानिक नागरिकांनी तात्काळ भोसरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहे.


पुढील स्‍लाइडवर पाहा, अपघातचे फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...