आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी चिंचवड : वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉस्पिटलमध्‍येच युवकांचा धिंगाणा, रूग्‍णांना धरले वेठीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड: वाढदिवस साजरा करण्यासाठी हुल्लडबाज युवकांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्‍ये घडली आहे. महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय परिसरात रुग्ण असलेल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्‍यासाठी 40 जणांचे टोळके रुग्णालयात शिरले. नंतर गोंधळ घालून रुग्णांना त्‍यांनी वेठीस धरले. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली असून सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.


तरुणांमध्ये सध्या वाढदिवस साजरा करण्याचे फॅड आहे. अशात त्‍यांच्‍या वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती डोकेदुखी ठरू लागल्या आहेत. शहरातील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातच एक मित्र रुग्ण असल्याने त्याला भेटण्यासाठी आरडा ओरडा करत, पापण्या वाजवत 40 युवक आत शिरले. त्‍यांनी अक्षरश: गोंधळ घालत मित्राचा वाढदिवस साजरा केला. या युवकांना रोखण्यात सुरक्षा रक्षकदेखील कमी पडले. 


अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करणे या युवकांना मात्र चांगलेच महागात पडले आहे. घटनेची माहिती होताच पिंपरी पोलिस रुग्णालयात दाखल झाले. त्‍यानंतर पोलिसांनी 24 युवकांना ताब्यातही घेतले. प्रतिबंधात्मक कारवाई करून त्‍यांना सोडून देण्‍यात आले आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा फोटोज व व्हिडिओ... 

 

बातम्या आणखी आहेत...