आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुकाराम मुंढे अन् वाद एक समीकरण, मुंढेंच्या बदलीसाठी खुद्द भाजपचेच मुख्यमंत्र्यांना साकडे!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी-चिंचवड- पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांची बदली करण्याची पिंपरी चिंचवड महापालिकेचे सभागृह नेता एकनाथ पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी केली आहे. मुंडे हे हेकेखोर आहेत, त्यांच्यामुळं उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा असताना उत्पन्न घटलं, त्यांनी अनेक कामगार रस्त्यावर आणले असे आरोप करत मुंडे यांची बदली करावी अशी मागणी केली आहे. ही मागणी माझ्या एकट्याची नसून सर्व भाजप नगरसेवकांची असल्याचं यावेळी सभागृह नेत्यांनी सांगितलं आहे.

 

पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारलयापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. आता तर कार्यकाळ संपण्यागोदर त्यांच्यावर पदभार सोडण्याची वेळ येऊ शकते. मुंढे शिस्त प्रिय असून अनेक टोकाच्या भूमिका त्यांनी घेतलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच १५८ पीएमपीएमएल कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय मुंढे यांनी घेतला त्यामुळे त्यांच्यावर सर्वच पदाधिकारी नाराज असून आता पिंपरी-चिंचवड मधील सत्तारूढ नेते एकनाथ पवार यांनी त्यांची बदली करावी अस पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. तसेच ही पक्षाची भूमिका असल्याचे देखील म्हटले आहे. याला महापौर नितीन काळजे यांनी पाठिंबा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मात्र याची कल्पना महापौर नितीन काळजे यांना नव्हती, अशी माहिती स्वतः महापौर यांनी दिली आहे.

 

दोन दिवसांपूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीएमएलच्या बसचालकांनी पिंपरी चिंचवडच्या महापौरांची भेट घेतली होती. पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी केलेली बडतर्फीची कारवाई अयोग्य असल्याच यावेळी बसचालकांनी सांगितलं होत. नोकरीवर पुन्हा रुजू करावे यासाठी महापौर आणि पीएमपीएमएलचे संचालक नितीन काळजे हे पत्र देणार होते. मात्र आता सत्तारूढ नेत्यांनीच मुंढे यांच्या बदलीचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या १५८ बदली चालकांना वेळेवर बदली मिळत होती. मात्र तुकाराम मुंडे आल्यापासून काम मिळणं बंद झालं आणि उलट त्यांनीच गैरहजेरीचा ठपका ठेवला असा आरोप चालकांनी केला होता. भाजपच्या पदाधिकारी नगरसेवकांच्या रेट्यामुळे पीएमपीएमएल अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची नवी मुंबईत नंतर आता पुणे पिंपरी-चिंचवडमधून बदली होणार का? याची उत्सुकता आहे.

बातम्या आणखी आहेत...