आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OSHO संपत्‍ती विवाद: हायकोर्टाने पुणे पोलिसांना फटकारले, स्‍वाक्षरी तज्ञाकडून तपास करण्‍याचे निर्देश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/मुंबई- अध्‍यात्मिक गुरू ओशो यांच्‍या वारसा हक्‍काच्‍या विवादावरून मुंबई हायकोर्टाने पुणे क्राईम ब्रँचला फटकारले आहे. पुणे पोलिसांच्‍या तपासावर हायकोर्टाने असामाधान व्‍यक्‍त करत आपण तपास अहवाल मागितला होता, एखाद्या कंपनीचा वार्षिक अहवाल नाही, अशा शब्‍दांत पोलिसांची कानउघाडणी केली. तसेच पुढील सुनावणीवेळी तपासाचा प्रगति अहवाल सादर करण्‍याचे निर्देशही हायकोर्टाने पोलिसांना दिले. ओशो यांच्‍या बनावट स्‍वाक्षरीद्वारे त्‍यांच्‍या वारसासंबंधीचे मृत्‍यूपत्र बनवल्‍याचा दावा त्‍यांच्‍या एका शिष्‍याने केला आहे. यासंबंधीच्‍या याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरू आहे. 


काय आहे प्रकरण 
- ओशोंचे शिष्‍य योगेश ठक्‍कर यांनी पुण्‍यातील ओशो आश्रमच्‍या 6 प्रशासकांविरोधात कोरेगाव पोलिस स्‍टेशनमध्‍ये 2013मध्‍ये तक्रार दाखल केली होती. 2013मध्‍ये या प्रशासंकाद्वारे युरोपीयन कोर्टामध्‍ये जे मृत्‍युपत्र सादर केले गेले ते बनावट असल्‍याचा दावा योगेश ठक्‍कर यांनी केला होता. यासंबंधी योगेश ठक्‍कर यांच्‍या वकीलांनी मुंबई हायकोर्टात सांगितले की, ओशो यांच्‍या मृत्‍यूच्‍या तब्‍बल 23 वर्षांनंतर त्‍यांचे मृत्‍यूपत्र सादर करण्‍यात आले. तसेच ओशो यांचा मृत्‍यू भारतात होऊनही मृत्‍युपत्र मात्र युरोपीयन कोर्टात सादर केले गेले. ठक्‍कर यांनी दावा केला आहे की, मृत्‍युनंतर त्‍यांच्‍या जवळील अनुयायांनी डॉक्‍टरांना त्‍यांच्‍या डेड बॉडीची तपासणी न करू देताच त्‍यांच्‍याकडून डेथ सर्टिफिकेट बनवून घेतले. त्‍यांनी डॉक्‍टरांना ओशोंना बघू देखील दिले नाही. त्‍यांना मृत्‍युचे कारण विचारले असता, दोन अनुयायांनी हार्ट अटॅकमुळे ओशोंचा मृत्‍यु झाला, असे सांगितले.  

 

एवढी आहे ओशोंची संपत्‍ती 
ठक्‍कर यांनी ज्‍या प्रशासकांविरोधात तक्रार केली आहे, त्‍यांच्‍याकडे ओशोंच्‍या पेंटिंग, ऑडिओ, व्हिडिओ आणि पुस्‍तकांचे अधिकार आहेत. अनेक भाषांमध्‍ये हे साहित्‍य प्रकाशित असून दरवर्षी त्‍यांच्‍या कमाईतून कोट्यावधींची कमाई केली जाते. यामध्‍ये हजार तासांचे ओशांचे प्रवचन, 1870 तासांचे भाषण आणि जवळपास 850 पेंटिंग्‍सचा समावेश आहे. त्‍यांच्‍या वक्‍तव्‍यावर आधारीत जवळपास 650 पुस्‍तके जगभरातील 65 भाषांत प्रकाशित झाली आहेत. 

 

कोर्टाने काय दिले निर्देश 
सुनावणीदरम्‍यान पोलिसांनी कोर्टाला सांगितले की, ओशोंच्‍या सहींची फोटोकॉपी आम्‍हाला मिळाली आहे, त्‍यावरून मात्र कोणत्‍याच निष्‍कर्षावर येता येत नाही. याव्‍यतिरिक्‍त काही जणांकडे चौकशी करण्‍यात येत असून, सध्‍या तपास सुरू आहे. यावरून हायकोर्टाने पोलिसांना फटकारत, सध्‍या विज्ञानाने बरीच प्रगती केली आहे. तुम्‍ही एखाद्या हँडरायटींग एक्‍सपर्टकडून याची तपासणी करू शकता, असे सांगितले. पुढील सुनावणी 8 ऑगस्‍टरोजी आहे. तेव्‍हा यासंदर्भातील अहवाल सादर करण्‍याचे निर्देशही हायकोर्टाने पुणे क्राइम ब्रँचला दिले आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पहा, ओशोंचे मृत्‍युपत्र...    

 

बातम्या आणखी आहेत...