आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशाच्या वादातून बिल्डरची हत्या, दाेन मारेकऱ्यांची ओळख पटली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत बिल्डर देवेन शहा.... - Divya Marathi
मृत बिल्डर देवेन शहा....

पुणे- डेक्कन जिमखाना परिसरातील प्रभात राेड येथील बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.  शनिवारी मध्यरात्री दोन व्यक्तींनी देवेन शहा (५५) यांची गोळ्या घालून हत्या केली होती. हल्लेखाेरांचे छायाचित्र इमारतीच्या सीसीटीव्हीत कैद झाले होते. त्याअाधारे संशयित अाराेपींची पाेलिसांनी अाेळख पटवली. रवी चाेरगे व राहुल शिवतारे अशी त्यांची नावे आहेत. पैशांच्या वादातूनच व्यावसायिकाची हत्या झाल्याचे तपासात समाेर आले अाहे.   


देवेन शहा यांच्या पत्नीचा शनिवारी वाढदिवस हाेता. हाॅटेलमध्ये कुटुंबीय वाढदिवस साजरा करून रात्री घरी अाल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता दुचाकीवरून दोन जण  शहा यांच्या इमारतीच्या खाली अाले. त्यांनी सुरक्षारक्षकास शहा यांना खाली बाेलावून अाणण्यास सांगितले. शहा हे अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये अाल्यानंतर दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

 

मालमत्तेचा वाद की खंडणीचे कारण?

पुण्यात यापूर्वीही काही बिल्डरांना खंडणीसाठी धमकावणे व हल्ले करण्याचे प्रकार घडलेले अाहेत. शहा यांच्या हत्येमागे खंडणीचे कारण अाहे की त्यांचा कुणाशी मालमत्तेवरून वाद हाेता, याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कदम करत आहेत.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, सीसीटीव्हीत कैद झालेले आरोपी....

बातम्या आणखी आहेत...