आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या पुण्यात ट्रायल घेतो मग तुम्हाला भेटायला येतो, छगन भुजबळांचे कार्यकर्त्यांना आश्वासन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छगन भुजबळ यांनी पुण्यातील फुले वाडयात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. - Divya Marathi
छगन भुजबळ यांनी पुण्यातील फुले वाडयात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.

नाशिक/पुणे- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांची नुकतीच जेलमधून सुटका झाली असून ते उद्या पहिल्यांदा पुण्यात राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेच्या समारोपात भाषण करणार आहेत. भुजबळ शनिवारी पुण्याला निघण्याआधी त्यांची कार्यकर्त्यांनी भेट घेतली. यावेळी भुजबळांनी त्यांना उद्या पुण्यात ट्रायल घेतो. त्यानंतर आठ दहा दिवसांत तुम्हाला नाशिकला भेटायला येतो असे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी पुण्यात पोहचून महात्मा फुले वाड्यात जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. 

 

छगन भुजबळ यांची भाजपचे उपमहापौर प्रथमेश गिते यांनी आज सकाळी मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मोठ्या संख्येने समता परिषद तसेच नाशिकचे कार्यकर्ते उपस्थित होते. युवा कार्यकर्त्यांची त्यांनी आस्थेने विचारपुस केली. पाऊस, नाशिक जिल्ह्यातील टंचाई तसेच अन्य विषयांची त्यांनी माहिती घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी तुम्ही नाशिकल कधी येणार अशी विचारणा करताच भुजबळांनी त्यांना मी उद्या पुण्याची ट्रायल घेतो आणि आठ दहा दिवसांत तुम्हा सगळ्यांना भेटायला नाशिकला येतो असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...