आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजीराजे राज्याभिषेक दिन: वयाच्या 23 व्या वर्षी शंभूराजे बनले स्वराज्याचे छत्रपती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक आजच्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारी 1681 रोजी झाला होता. शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी संभाजीराजे महाराजांच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनी छत्रपतीच्या गादीवर विराजमान झाले होते. रायगडावर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. आज यानिमित्त आपण छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. 18 व्या वर्षी युवराज तर 23 व्या वर्षी बनले छत्रपती......

 

- संभाजीराजेंचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला.
- वयाच्या दुस-या वर्षीच संभाजी यांच्या मातोश्रीचे निधन झाले. सईबाईच्या आकस्मिक निधनामुळे शंभुराजे लहानपणीच पोरके झाले.
- सईबाईच्या निधनानंतर जिजाऊंनी संभाजी महाराजांच्या पालनपोषणाकडे लक्ष दिले.
- जिजाऊंसोबत पुण्याजवळील कापूरहोळ येथील धाराऊ नावाची महिला बाल संभाजीची सांभाळ केल्याचा उल्लेख आढळतो.
- पुढे सोयराबाईंनी सुद्धा संभाजीराजांचा सांभाळ केल्याचे इतिहासात उल्लेख आहे.
- रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेज यांचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले.
- मोगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच समजले होते.
- वयाच्या नवव्या वर्षी 5 हजारांची मनसबदारी मिळाली होती.
- संभाजी महाराज केवळ 9 वर्षाचे असताना शिवरायांनी त्यांना आग्रा येथे नेले होते.
- शिवरायांची आग-यातील ऐतिहासिक सुटका झाल्यानंतर
त्या बालवयात संभाजी महाराज एकटे आग्राहून संकटांचा सामना करत परतले होते.
- शिवरायांनी संभाजीला लहान वयातच मोहिमांवर नेत असल्याने त्यांना लढ्यांचा अनुभव आला.
- वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी शंभूराजांना काव्य, लिखाणाची आवड लागली. याच काळात ते संस्कृत भाषेतील पंडित बनले.
- बुधभूषणम हा संस्कृत ग्रंथ तर इतर भाषांतचील तीन ग्रंथ संभाजी राजांनी 15 व्या वर्षीच लिहले.
- वयाच्या 18 व्या वर्षी ते युवराज बनले होते तर वयाच्या 23 व्या वर्षी छत्रपती बनले. 
- पुढे मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि लवाजमा असूनही शंभुराजे औरंगजेबाच्या हातील लागत नव्हते. पण काही फितुरांनी दगा दिली आणि महाराजांना कैद झाली.
- कदाचित महाराजांसमोर अशा प्रकारे फितुरांचे आव्हान नसते तर, महाराज कधीच औरंगजेबाच्या तावडीत सापडले नसते. 
- पण पुन्हा एकदा फितुरांनी स्वराज्याच्या पाठित खंजीर खुपसला आणि संभाजी महाराज औरंग्याच्या तावडीत सापडले. त्याच्या मनात संभाजी महाराजांविषयी एवढा राज होता, की त्याने महाराजांना वेदना देऊन देऊन ठार करायचे असे ठरवले.
- 7 एप्रिल 1889 रोजी औरंबजेबने संभाजी महाराजांना ठार मारले व पुण्याजवळील तुळापूर- वढू बुद्रूक येथे त्यांचा मृतदेह फेकून दिला. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, संभाजी महाराजांबाबत माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...