आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रेंना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान, प्रभाताईंनी व्यक्त केली ही इच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’(त्रिदल, पुणे) च्या वतीने दिला जाणारा 2018 यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ गायिका, डॉ.प्रभा अत्रे यांना ​गुरुवारी सायंकाळी  प्रदान करण्यात आला. बालंगधर्व रंगमंदिरात प्रसिद्ध संतूर वादक पंडीत शिवकुमार शर्मा ,  प्रसिद्ध बासरी वादक पंडीत हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद अमजद अली खान या दिग्गजांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा  पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर  महापौर मुक्ता टिळक ,अयान अली बंगश, उद्योजक गजेंद्र पवार उपस्थित होते. 

 
या पुरस्काराबरोबर सहा स्वातंत्र्यसैनिकांना, कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या सैनिकांना आणि वीर पत्नीना भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खा.डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. रघुनाथ गंगाराम लकेश्री, फुरबू रिंडॉल, संदीप बाजीराव उकिरडे, श्रीमती विनीता अशोक कामटे (कै.अशोक कामटे यांच्या वीरपत्नी), दिनदयाळ वर्मा, प्रल्हाद कृष्णराव रेभे यांनाही सन्मानित करण्यात आले .एक लाख रूपये रोख आणि बालशिवाजींची सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरित असलेली प्रतिमा, पुण्याच्या ग्राम देवतांसह असलेल्या या वैशिष्ठपूर्ण स्मृतिचिन्हाने या वर्षीच्या पुण्यभूषण पुरस्कारार्थी प्रभा अत्रे यांना गौरविण्यात आले. 
 
प्रभा अत्रे मनोगत व्यक्त करताना  म्हणाल्या, ' संगीताने, श्रोत्यांनी मला ओळख दिली. पुणेकरांना अभिमान वाटेल असं काही करायचं आहे. माझे गुरु सुरेश बाबू माने, हिराबाई बडोदेकर , किराणा घराणे यांचीही मी ऋणी आहे. संगीत शिक्षणाचा साकल्याने विचार व्हावा. रागसमय संकल्पनेचा विज्ञानाच्या कसोटीवर तपासावे. पुण्यात गुरुकुल उभारण्याची इच्छा आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
 

 

बातम्या आणखी आहेत...