आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुळेताई- पवार दादांची मुख्यमंत्र्यांना ‘ऑफर’; मुख्यमंत्र्यांकडून मात्र प्रत्त्युत्तर नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -  महाराष्ट्र सरकार कसे चालवायचे यासाठी स्वेच्छेने मोफत प्रशिक्षण देऊ शकतो, असे जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टि्वटरवरून चिमटा काढला आहे.  


गुरुवारी इंदापूर तालुक्याच्या (जि. पुणे) दौऱ्यावर असताना खासदार सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका   केली होती. “तीन-तीन वर्षे अभ्यास करूनही जर राज्यातील प्रश्न सुटत नसतील तर सरकार चालवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्यूशन लावण्याची गरज आहे. आणि ट्यूशन अजित पवार यांच्याइतकी चांगली कोणीच घेऊ शकत नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडे ट्यूशन लावावी,” असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. 


सुळे यांच्या या वक्तव्याची दखल स्थानिक माध्यमांनी घेतली होती. बहिणीच्या या वक्तव्याचा आधार घेत माजी उपमुख्यमंत्री अजित दादांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना मोफत प्रशिक्षणाची ‘ऑफर’ टि्वटरवर दिली. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र सुळे आणि पवारांनी केलेल्या या हल्ल्याला प्रत्त्युतर देण्याचे टाळले.  

 

अजित पवारांचे टि्वट  
“कधी कधी आरएसएस शाखेचे शिक्षण अपुरे पडते, जेव्हा कळते की, प्रत्यक्षात जनतेचे नुकसान होतेय. महाराष्ट्र सरकार कसे चालवायचे यासाठीचे प्रशिक्षण स्वेच्छेने मोफत देऊ शकतो. राज्य शासन चालवणे आणि गरीब शेतकऱ्यांप्रती सहानुभूती कशी असावी, याचे अभ्यासक्रमदेखील सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.’  

 

पवारांनाच फटकारे  
अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलेल्या टि्वटवर अनेक जण तुटून पडल्याचे दिसून आले आहे. “मुख्यमंत्र्यांना काय शिकवणार? धरणात कसेxxx, शेतकऱ्यांवर गोळीबार कसा करावा, सिंचन घोटाळा कसा करावा, लवासा कसे बांधावे,’ असे प्रश्न पवारांना विचारण्यात आले आहेत. “आधी मुख्यमंत्री कसे बनावे याचा अभ्यास करा, नंतर मुख्यमंत्र्यांची शिकवणी घेण्याचा विचार करा,’ असाही सल्ला नेटकऱ्यांमार्फत अजित पवारांना देण्यात आला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...