आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे- पोलिसांना गुंगारा देऊन भरचौकातून आरोपीचे पलायन, पत्नीच्या खुनामुळे झाली होती अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शहरातील गजबजलेल्या अप्पा बळवंत चौकातून पोलिसांच्या तावडीतून एका आरोपीने पलायन केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. हा आरोपी पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात अटकेत होता. त्याला सिंहगड रोड पोलिस ठाण्यातून फरासखाना पोलिस ठाण्यात आणले जात होते. पोलिस स्टेशन जवळ येताच त्याने संधी साधली आणि पलायन केले. पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल उर्फ राजेश हांडाळ (22, मानाजीनगर, न-हेगाव) याने त्याची पत्नी कोमल (22) हिचा दोन दिवसांपूर्वी खून केला होता. त्याच्यावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी त्याला अटक केली होती. त्याला कोर्टात हजर केले असता त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली. पोलिस त्याला फरासखाना पोलिस स्टेशनमधील कोठडीत घेउन जात होते त्यावेळी त्याने संधी साधून पलायन केले. 

बातम्या आणखी आहेत...