आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनेच्‍या त्रासाला कंटाळून सासू-सास-याचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न, सास-याचा मृत्‍यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सुनेच्या त्रासाला कंटाळून सासू आणि सासऱ्यानी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यात रुग्णालयात उपचार सुरू असताना सास-याचा मृत्यू झाला. विषारी औषध घेण्यापूर्वी दोघांनी चिठ्ठी लिहिली आहे. यात सुनेचा तसेच ठेकेदाराचा उल्लेख केला आहे. ही घटना आज (गुरूवारी) चाकण परिसरात घडली. चाकण पोलीस घटनेचा तपास करीत आहे.


अनिल चिमाजी धोतरे (वय 48) अस मृत्यू झालेल्या सास-याचे नाव आहे. तर शांताबाई अनिल धोतरे (वय 45) सासूचे नाव आहे. सासूवर सध्या उपचार सुरू असून त्‍यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अनिल चिमाजी धोतरे, शांताबाई अनिल धोतरे हे पतीपत्नी चाकण नगरपरिषदेत सफाई कामगार म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा अविनाश याचा विवाह झाला असून त्याची पत्नी कोमल अविनाश धोतरे त्‍यांच्‍यासोबत राहत नाही. ती माहेरी असते. सून कोमल व तिच्‍या आई-वडीलांनी मयत सासरे अनिल आणि सासू शांताबाई यांच्यावर हुंडा घेतल्याचा आरोप करत त्‍यांना न्यायालयात खेचले आहे. याची तारीख दीड ते दोन महिन्याला असायची.  यामुळे त्यांचा रोजगार बुडत होता. यामुळे  सासू सासरे त्रस्त झाले होते. तसेच ठेकेदारानी दोघांना नोकरीवरून काढण्याची धमकी दिली होती. गेल्या सहा महिन्यांपासून दोघांचा पगार देखील केला नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

 

याचीच तक्रार चाकण पोलिसात मयत अनिल आणि शांताबाई यांनी केली होती. मात्र त्यांनी योग्य दखल घेतली नाही. अखेर दोघांनी 12 जून रोजी दोघांनी चिठ्ठी लिहीत विषारी औषध घेतले. त्यानंतर दोघांवर उपचार सूर होता. आज सकाळी अनिल धोतरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. परंतु जो पर्यंत संबंधितांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मृतदेह घेऊन जाणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, आत्‍महत्‍येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी...

 

बातम्या आणखी आहेत...