आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक आॅफ महाराष्ट्रच्या निलंबित व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अडीच कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी सीबीआयने बँक ऑफ महाराष्ट्रचे निलंबित व्यवस्थापक शालिवाहन मुकुंद सोलेगांवकर (कोथरूड, पुणे) व राकेश चंद्रकांत जाधव (बिरवाडी, रायगड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


बँकेच्या पुणे जिल्ह्यातील ५ शाखांत चुकीच्या एंट्री करून २००९ ते २०१७ दरम्यान २ कोटी ५६ लाख १५,९९८ रुपयांचा घोटाळा करण्यात आला होता. त्याची आधीच कुणकुण लागल्याने बँकेने यापूर्वीच व्यवस्थापकास निलंबित केलेले आहे. २००९ ते २०१७ दरम्यान सोलेगांवकर सहकारनगर, लवळे, लासुर्णे, हडपसर व तळेगाव दाभाडे शाखांत ३ हजार खोट्या नोंदी करून बँक खात्यात २.५६ कोटी रुपये वर्ग केले. 

बातम्या आणखी आहेत...