आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत अपूर्ण, पण चुकीचा नाही हे अनेक निरीक्षणातून सिद्ध: डॉ. नारळीकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- 'डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत बरोबर आहे, हे अनेक निरीक्षणातून सिद्ध झाले आहे', असे मत प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ  डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री  डॉ. सत्यपाल सिंग  यांचे मत त्यांनी खोडून काढले आहे. डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतातील अनेक बाबी अजून समजलेल्या नाहीत, यामुळे तो सिद्धांत अपूर्ण आहे असे म्हणता येईल, मात्र तो चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही, असे डॉ. नारळीकर यांनी स्पष्ट केले आहे. 

 

 

काय म्हणाले होते सत्यपास सिंह
केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी माकड हा माणसाचा पूर्वज नसल्याचे म्हणत डार्विनचा सिद्धांत नाकारला होता. डार्विनचा सिद्धांत शाळेत शिकवला जाऊ नये असे वक्तव्यही डॉ. सिंह यांनी केले होते. 

 

 

नारळीकर काय म्हणाले?

या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना डॉ. नारळीकर यांनी डार्विनचा सिद्धांत बरोबर असल्याचे म्हटले आहे. खगोलशास्त्र हे केवळ ग्रह आणि ताऱ्यापुरते मर्यादित नाही, तसेच इतर शास्त्रही काळानुसार पुढे गेली आहेत. विज्ञानाच्या अनेक संकल्पना सोप्या पध्दतीने मराठी भाषेतून सर्वसामान्यांपर्यत पोहोचल्या पाहिजेत, त्यासाठी मराठी साहित्यिकांनी अधिकाधिक विज्ञानलेखन केले पाहिजे असे आवाहनही डॉ. जयत नारळीकर यांनी केले.

 

 

नारळीकर म्हणाले, केंब्रिज विद्यापीठात असताना मार्गदर्शक फ्रेड हॉयल यांच्याकडून प्रेरणा घेऊन मराठी भाषेत विज्ञानलेखन करायला मी सुरुवात केली. विज्ञानकथेतून मुख्यत: विज्ञानाचा आणि वैज्ञानिक संकल्पनांचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, परंतु मराठीमध्ये लिहिण्यात येणाऱ्या विज्ञान कथा भयकथा वाटतात, त्यासाठी लेखन आणि विज्ञानाचा समतोल राखणे गरजेचे आहे. 

 


सामान्य माणसाला विज्ञान किती आणि कसे समजते हे शास्त्र आणि अभ्यासक लक्षात घेत नाहीत. मी स्वत:ला चांगला साहित्यिक मानत नाही. त्यामुळे मी लिहिलेल्या लेखातून विज्ञान किती चांगल्या प्रकारे लोकांपर्यत पोहोचते मला माहिती नाही, त्यासाठी चांगल्या मराठी साहित्यिकांनी अधिकाधिक विज्ञानासंदर्भात लेखन केले पाहिजे असेही डॉ. जयंत नारळीकर यावेळी म्हणाले. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 

बातम्या आणखी आहेत...