आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • पुण्‍यात भाजप नगरसेवकावर जीवघेणा हल्‍ला, Deadly Attack On Bjp Corporator Balaji Kamble In Pune

PUNE: भाजप नगरसेवकाची भररस्‍त्‍यात निर्घृण हत्‍या, कोयत्‍याने डोक्‍यावर केले वार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अाळंदी नगर परिषदेतील भाजपचे नगरसेवक बालाजी कांबळे (३४) यांची अज्ञात हल्लेखाेरांनी मंगळवारी भरदिवसा पुणे-अाळंदी रस्त्यावर चऱ्हाेलीजवळ काेयत्याने वार करून हत्या केली. नगरसेवक कांबळे यांना तातडीने पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले. 


बालाजी कांबळे हे बांधकाम व्यावसायिक असून अाळंदी येथे राहण्यास अाहेत. डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या अाळंदी नगर परिषदेच्या निवडणुकीत ते प्रभाक क्रमांक नऊमधून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक आले. मंगळवारी दुपारी कांबळे हे दुचाकीने पुणे येथे अाले हाेते. त्यानंतर पावणेपाचच्या सुमारास ते अाळंदीकडे जाताना पाठलाग करणाऱ्या दाेन अज्ञात हल्लेखाेरांनी त्यांच्या डाेक्यात व शरीरावर काेयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर कांबळे यांना रुग्णालयात हलवण्यात अाले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णालयाच्या परिसरात कांबळे समर्थकांनी माेठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 

बातम्या आणखी आहेत...