आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लांडग्यांच्या हल्ल्यात अाठ मेंढ्यांचा मृत्यू; देवपूर येथील घटनेने पशुपालकांत खळबळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर- देवपूर येथील गडाख वस्तीवर लांडग्यांच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात पशुपालक जाधव यांच्या अाठ मेंढ्यांचा मृत्यू झाला. सहा मेंढ्या जखमी झाल्या आहेत. मंगळवारी मध्यरात्रीहा हल्ला झाला. मेंढपाळांना पाऊस व विजांचा कडकडाटामुळे बुधवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार यांनी पशुपालकांना जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी मागणी वनविभागाकडे केली आहे.


वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, अनिल साळवे, पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद भणगे यांनी पंचनामा केला. एक ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, लांडग्यांचा असाच धुमाकूळ सुरू राहिल्यास पशुपालकांसमोर मोठी समस्या उभी राहणार आहे. याबाबत तोडगा काढण्याचीही मागणी केदार यांनी केली. वावी येथील मेंढपाळ सोमनाथ खंडू जाधव, दत्तू जाधव व संजय गोराणे यांनी देवपूर येथे मेंढ्या चारण्यासाठी आणल्या होत्या. राजेंद्र गडाख यांच्या वस्तीवर मेंढ्या बसविण्यात आल्या. 

बातम्या आणखी आहेत...