आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएसके यांच्या जामीन अर्जावर 13 मार्चला निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ठेवीदारांकडून मुदतठेवी स्वीकारुन त्याची परतफेड न केल्याने अटकेत असलेले प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक डी.एस.कुलकर्णी अाणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी सध्या न्यायालयीन काेठडीत अाहे. साेमवारी त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी हाेणार हाेती. मात्र, सरकारी पक्षाने त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी वेळ मागितल्याने डीएसके यांच्या जामीन अर्जावर १३ मार्च राेजी सुनावणी हाेणार अाहे. दरम्यान, डीएसके प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पाेलिस अायुक्त नीलेश माेरे म्हणाले, मुंबइ, काेल्हापूर अशा ठिकाणीही डीएसके यांच्याविराेधात गुन्हे दाखल अाहेत. डीएसके यांनी यापूर्वी न्यायालयात सांगितले हाेते की, त्यांच्या ठाणे शहरातील एका प्रकल्पाचे सहा काेटी ५५ लाख रुपयांचा हिस्सा मला मिळणार अाहे. त्या पैशांमधून अाजारी अाणि लग्नासाठी गरजू ठेवीदारांना तात्काळ मदत करू इच्छिताे. त्याबाबतचा ड्राफ्ट तयार असून रजिस्ट्रेशनसाठी व्यवहाराची परवानगी मिळावी. सदर व्यवहारातील पैसे मुंबई पाेलिसांना ठेवीदारांना देण्यासाठी मिळावेत, अशी मागणी करण्यात अाली अाहे. 
बातम्या आणखी आहेत...