आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपवर हल्लाबाेल: अजित पवारांची जीभ घसरली; धनंजय मुंडे यांनी ‘घसरू’ दिली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - बेताल वक्तव्यांमुळे वारंवार अडचणीत येणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांची जीभ बुधवारी पुन्हा एकदा घसरली. तर त्यांच्याच पक्षाचे नेते व विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जाणीवपूर्वक जीभ ‘घसरू’ दिली. पुणे जिल्ह्यात बुधवारी झालेल्या दोन हल्लाबोल सभांमध्ये बोलताना तोल गेलेले पवार आणि तोल गेल्याचे ‘भासवणारे’ मुंडे लोकांना ऐकायला मिळाले.


पिंपरीतील सभेत बोलताना अजित पवार यांनी श्रोत्यांना उद्देशून प्रश्न केला, की ‘आमच्या काळात पावणेचारशे रुपयाला गॅस सिलिंडरर होता. आता केवढ्याला मिळतो? ८२०  झालाय का ८५० रुपयांना ?’  पवारांच्या या प्रश्नावर श्रोत्यांमधून दोन-तीन वेगवेगळे आकडे आले. ते ऐकून पवार म्हणाले, “हा साडेआठशे म्हणतोय म्हटल्यावर बायकोने आजच त्याला पाठवले आहे वाटते सिलिंडर आणायला. ८२० रुपये असेल की ८४० रुपये असेल. चल तुझं खरं. तुझी लाल.” पवारांच्या या टिप्पणीमुळे संबंधित युवकाने मान खाली घातली तर व्यासपीठावर बसलेल्या ‘राष्ट्रवादी’ नेत्यांमध्ये हशा पिकला.


तिकडे पुण्यातल्या वारजे येथील सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला केला. “राज्यातल्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र ‘फसवणीस’ साहेब...” असा उल्लेख मुंडे यांच्याकडून होताच त्यावर हशा पिकला. ते पाहून, “माझी जीभ घसरली. मला ‘फडणवीस’ असे म्हणायचे नव्हते,” असा खुलासा मुंडेंनी केला. प्रत्यक्षात मात्र त्यांचे भाषण संपेपर्यंत त्यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख सातत्याने ‘देवेंद्र फसवणीस’ असाच केला.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचाही समाचार मुंडे यांनी घेतला. ते म्हणाले, “तुमचे वय काय तुम्ही बोलता काय ? तुम्ही जेव्हा तोतरं बोलत शुभंकरोती म्हणत होतात, तेव्हा आमच्या साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. टीका करताना दिल्लीतल्या नरेंद्र मोदी गुरूला तरी विचारायचं की, कारण मोदीच सांगतात की पवार यांची करंगळी पकडून राजकारणात आलो. लायकी नसताना शरद पवार साहेबांवर टीका करतात.’

 

मुंबईत बहीण-भावाची गळाभेट, पुण्यात टीका
एक दिवस अाधी मुंबईतल्या एका जाहीर कार्यक्रमात बहीण पंकजा मुंडे यांची गळाभेट घेतलेल्या धनजंय मुंडे यांनी पुण्यात मात्र त्यांच्यावर हल्ला चढवला. “आमच्या बहिणीने चिक्कीत पैसे खाल्ले,” असा आरोप धनंजय यांनी केला. भाजपच्या सोळा मंत्र्यांनी ९० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. चिक्कीपासून उंदरांपर्यंत घोटाळे केले. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही, असे ते म्हणाले.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, भाजप नेत्यांनी उपोषणातून कोणता तीर मारला : सुळे...

 

 

बातम्या आणखी आहेत...