आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनंजय मुंडेंची भाजपच्या 'संपर्क फाॅर समर्थन'वर टीका- ते माधुरीकडे गेले आपण मजुराकडे जाऊ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राष्ट्रवादीच कांग्रेस विधान परिषदेतील विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपाच्या संपर्क फाॅर समर्थन या अभियानावर सडकून टीका केली आहे. पेट्रोल-डिझेल गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा परिणाम माधुरी दीक्षितवर होणार आहे का, असा सवाल करत ते माधुरी दीक्षितकडे गेले तर आपण मजुरांकडे जाऊ. ते टाटांकडे गेले तर आपण बाटा घालणाऱ्या सामान्य माणसाकडे जाऊ. ते कपिल देवकडे गेले तर आपण बळीदेवाकडे जाऊ, असे वक्तव्य त्यांनी केले. ते राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या 19 व्या वर्धापन दिवस तसेच हल्लाबोल यात्रेच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते. 

 

भाजपवर हल्लाबोल करताना मुंडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या भाजपाला सहा जूनला महाराजांच्या राज्याभिषेकाचाही विसर पडला आहे.  शिवराज्याभिषेकाचा दिवस विसरून अमित शाह मुख्यमंत्र्यांसोबत माधुरी दीक्षितला भेटले. त्यांना यशाची पुस्तिका दाखवून काय साधलं? महागाई, दरवाढीची झळ त्यांना समजणार आहे का? शिवराज्यभिषेकास न जाता माधुरीच्या घरी गेलेल्यांना शिवरायांचा मावळा विसरणार नाही राष्ट्रवादी काॅग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुनील तटकरे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख तसेच राज्यभरातून कार्यक्रमासाठी आलेले हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...