आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राह्मण महासंघ-संभाजी ब्रिगेड आमनेसामने; दादाेजी काेंडदेव प्रतिमा पूजनावरून पुन्हा राजकारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- दादाेजी काेंडदेव यांच्या पुण्यतिथीचे अाैचित्य साधून त्यांच्या प्रतिमेचे ब्राह्मण महासंघाच्या वतीने बुधवारी सकाळी पुणे महानगरपालिकेच्या अावारात पूजन करण्यात अाले. याबाबतची माहिती संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ब्राह्मण महासंघ अाणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांत वाद झाला. दरम्यान, पोलिसांच्या आवाहनानंतर ब्राह्मण महासंघाच्या  कार्यकर्त्यांनी प्रतिमा नेल्याने पुढील वाद निवळला.  

  
दवे म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून अाम्ही लाल महालात जाऊन दादाेजींना श्रद्धांजली वाहतो. गेली सात वर्षे पुतळा ताेडल्यापासून अाम्ही दरवर्षी अाजच्या दिवशी कार्यालयात हा कार्यक्रम घेत आहोत. वारंवार मागण्या करूनही अाणि अाश्वासने देऊनही प्रशासन दादाेजींचा पुतळा बसवत नाही. त्यामुळे उद्विग्नेतून अाम्ही एक प्रतिमा मनपात घेऊन येत त्याची पूजा केली. राम गणेश गडकरी यांच्या प्रतिमेप्रमाणेच ती प्रतिमा अाम्ही काही वेळाने घेऊन जाऊ हे सुरुवातीला स्पष्ट केले हाेते. प्रशासनाला अाठवण करून देण्यासाठी अाम्ही पालिकेच्या अावारात प्रतिमापूजन केले. मात्र, संभाजी ब्रिगेडच्या लाेकांनी त्या ठिकाणी येऊन त्यास विराेध केला. संभाजी ब्रिगेडनेदेखील  दादाेजी काेंडदेव यांचा पुतळा लाल महाल साेडून काेठेही बसवावा हे स्पष्ट केल्याने अाता काेणता वाद राहिलेला नाही. त्यामुळे शासनाने दादाेजींचा पुतळा पुणे शहरात काेठेही बसवावा, अशी अामची मागणी अाहे.    


लाल महालात शहाजीराजेंचा पुतळा बसवा : संभाजी ब्रिगेड 
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संताेष शिंदे म्हणाले, ब्राह्मण महासंघाकडून दादाेजी काेंडदेव यांच्या पुतळ्याचे राजकारण करण्यात येत अाहे. लाल महालात जिजाऊ शिवरायांच्या समूह शिल्पामध्ये महाराज शहाजीराजे भाेसले यांचा पुतळा बसवावा, अशी अामची मागणी  आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज.... 

बातम्या आणखी आहेत...