आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेहाच्या अफवेने उडाली खळबळ, सत्य समोर येताच लोकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शहरातील सिंहगडरोड कडून स्वारगेटकडे जाणा-या कॅनाॅलमध्ये मुलाचा मृतदेह वाहत आल्याची अफवा पसरल्याने एकच खळबळ उडाली. कॅनाल जवळ बघ्यांची एकच गर्दी उसळली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. पण मृतदेहाजवळ पोहचताच सत्य बाहेर आले आणि सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. काय आहे नेमके प्रकरण.....

 

 शहरातून तुडूंब भरून वाहरणाऱ्या कॅनलमध्ये दर दोन चार दिवसाला मृतदेह सापडत आहेत. शुक्रवारी सकाळी अशाच प्रकारे कॅनलमध्ये लहान बाळाचा मृतदेह वाहून आल्याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला मिळाली. लहान बाळाचा मृतदेह असल्याचे कळताच अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ऐन वर्दळीच्या वेळी रस्त्यावर बघ्यांनी मोठी गर्दी केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात उतरून बाभळीच्या झाडामध्ये अडकलेला मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतू, जवळ गेल्यानंतर हा मृतदेह नसून, खेळण्यातील बाहुली असल्याचे समोर आले. 

बातम्या आणखी आहेत...