आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षांनंतरही डाॅ. दाभाेलकरांचे मारेकरी न सापडणे शरमेची बाब; डॉ. हमीद दाभोलकर यांची सरकार टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येला पाच वर्षांचा कालावधी उलटूनही पाेलिस, सीअायडी पथक यांना अजूनही खऱ्या मारेकऱ्यांना पकडता आले नाही ही शरमेची बाब अाहे. पत्रकार गाैरी लंकेश खून प्रकरणाचा तपास वेगाने करण्यात येत असून त्यासंदर्भात दाेषींवर कारवाई करण्यात येते. मात्र, डाॅ. दाभाेलकर, काॅ. पानसरे, साहित्यिक कलबुर्गी यांच्या हत्येचा असा तपास केला जात नसल्याची खंत डाॅ. दाभाेलकर यांचे पुत्र अाणि अंनिसचे सरचिटणीस डाॅ. हमीद दाभाेलकर यांनी शुक्रवारी व्यक्त केली. 


डाॅ. दाभाेलकर यांच्या हत्येला ५९ महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप मारेकरी न सापडल्याने अंनिसच्या वतीने महर्षी वि. रा. शिंदे पुलावर निषेध अांदाेलन करण्यात अाले. या वेळी ते बाेलत हाेते. डाॅ. हमीद म्हणाले, विवेकवादी विचारांना सध्या धाेका वाढत असून देशात हिंसेचे वातावरण अाहे. स्वामी अग्निवेश यांच्यावर काही धर्मांध लाेकांनी हल्ला केला या गाेष्टीचा अंनिसच्या वतीने निषेध व्यक्त करत अाहे. विचारांचा प्रतिवाद विचारांनी करता न येणाऱ्या लाेकांकडून अशा प्रकारचे भ्याड हल्ले हाेतात. लाेकशाहीत शासनाने त्यावर वेळीच अंकुश ठेवणे गरेजेचे अाहे. डाॅ. दाभाेलकर यांचे मारेकरी मिळेपर्यंत अंंनिसच्या वतीने दर महिन्याला अशा प्रकारचे अांदाेलन यापुढील काळातही सुरूच राहील. २० जुलै ते २० अाॅगस्ट यादरम्यान 'जवाब दाे' अांदाेलन तीव्र करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...