आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DSK ना सुप्रीम कोर्टाकडून जामीन? 19 जानेवारीपर्यंत पैसे भरण्यास मिळाली मुदतवाढ: डीएसके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मुंबई हायकोर्टाने दिलेल्या मुदतीत ५० काेटी रुपये जमा न केल्याने बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांना अटक करण्याचा पाेलिसांचा मार्ग माेकळा झाला हाेता. मात्र, डीएसके यांनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली. कोर्टाने अापल्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला असून १९ जानेवारीपर्यंत ५० काेटी रुपये भरण्यास मुदतवाढ दिल्याचा दावाकुलकर्णी यांनी केला.    


सुप्रीम कोर्टाच्या मुदतीत सर्व रक्कम जमा करण्यात येईल.  कोर्टाने अामचे म्हणणे ग्राह्य धरून मुदत वाढवून देत अामच्यावर विश्वास दाखवला अाहे. अाता सर्व गाेष्टी व्यवस्थित हाेतील व व्यवसाय नक्कीच पूर्वपदावर येईल, असा अाशावाद डी.एस.कुलकर्णी यांनी व्यक्त केला अाहे.  दरम्यान, अार्थिक गुन्हे शाखेचे पाेलिस उपायुक्त सुधीर हिरमेठ यांनी अाम्हाला अद्याप सुप्रीम कोर्टाने डीएसकेंना पैसे भरण्यास मुदतवाढ दिल्याचा अादेश प्राप्त झाला नसल्याचे सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...