आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनावणीदरम्यान डीएसकेंना कोसळले रडू;खासगी रुग्णालयात उपचाराला परवानगी नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- डीएसके समूहाच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता अाहेत. मृत्यूआधी गुंतवणूकदारांचे मला पैसे देऊ द्या साहेब..पाेलिस फार दयावान अाहेत, पण त्यांनाही मर्यादा अाहेत.. मला खासगी रुग्णालयात जाऊ द्यावे, असे  सांगताना पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना न्यायालयात  रडू कोसळले. यावर न्यायाधीश म्हणाले, मला सगळ्यांच्या भावना मान्य अाहेत. तुमचा त्रास समजताेय, जे झाले त्याबाबत कायद्याप्रमाणे तुमचे पैसे मिळण्याची प्रक्रिया सुरू हाेर्इल. दरम्यान, डीएसके दांपत्यास न्यायालयात हजर करण्यापूर्वी महिला संघर्ष समितीच्या शेकडाे महिलांनी डीएसके यांच्याविराेधात घाेषणाबाजी केली.   


ठेवीदारांचे पैसे घेऊन त्याची परतफेड न केल्याप्रकरणी डी.एस.कुलकर्णी अाणि हेमंती कुलकर्णी यांची पाेलिस काेठडीची मुदत संपुष्टात अाल्यानंतर त्यांना गुरुवारी न्यायालयात करण्यात आले. न्यायालयाने डीएसके दांपत्यास १५ मार्चपर्यंत न्यायालयीन काेठडीत ठेवण्याचे अादेश दिल्याने दाेघांनाही येरवडा मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात अाले अाहे. दरम्यान, डीएसके यांनी वकिलांमार्फत न्यायालयात अर्ज करून प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचाराची परवानगी मिळावी, अशी मागणी केली. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळत येरवडा कारागृह प्रशासनाला डीएसके यांना अावश्यक त्या सर्व उपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.  तसेच सरकारी रुग्णालय असलेल्या ससून हाॅस्पिटलमध्ये घेऊन जावे की नाही याचा निर्णय त्यांनी घ्यावा, असे  निर्देश न्यायालयाने दिले.


साडेसहा काेटी देऊ : डीएसके
ठाणे शहरात एका प्रकल्पाचा सहा काेटी ५५ लाख रुपयांचा हिस्सा मला मिळणार अाहे. त्या पैशांमधून अाजारी अाणि लग्नासाठी गरजू ठेवीदारांना तात्काळ मदत करू इच्छिताे. त्याबाबतचा ड्राफ्टही तयार असून रजिस्ट्रेशनसाठी मला व्यवहाराची परवानगी मिळावी. मात्र, पाेलिस मला  काहीही करू  देत नाहीत, असेही डीएसकेंनी या वेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...