आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डीएसकेंना सहा महिने मुदतवाढ देण्याची वकिलांची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ठेवीदारांचे पैसे परत करण्यास असमर्थ ठरलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी अाणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना ठेवीदारांचे पैसे परत करण्याकरिता सहा महिन्यांची मुदतवाढ न्यायालयाने द्यावी. डीएसके कारागृहाबाहेर अाल्यानंतर लगेच जमीन विक्री करून पैशांची उभारणी करतील, असा युक्तिवाद डीएसके यांचे वकील श्रीकांत शिवदे यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. टी. उत्पात यांच्या न्यायालयात मंगळवारी केला.

    

डीएसकेंच्या जामीन अर्जावर न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. डीसकेंच्या वकिलाने सांगितले की, नागरिकांना माेठ्या प्रमाणात किंमत देऊन डीएसकेंनी जमिनी खरेदी केल्या अाहेत. इस्रायलच्या कंपनीसाेबत त्यांचा “डीएसके ड्रीम सिटी’ प्रकल्पाकरिता करार झाला हाेता. मात्र, हा करार काही दिवसांत संपुष्टात अाल्याने डीएसके उद्याेग समूहाला उतरती कळा लागली. त्यातच लाेणावळ्यात २०१६ मध्ये डीएसकेंच्या गाडीला भीषण अपघात हाेऊन त्यांना एक वर्ष अपंगत्व अाल्याने वेळ वाया गेला. या काळात जागतिक मंदी, नाेटबंदी, सिमेंट-स्टीलच्या किमतीतील वाढ यामुळे अार्थिक संकटात ते सापडले.

 

मध्यंतराच्या काळात काही गुंतवणूकदारांचे पैसे त्यांनी परत केले. गुंतवणूकदारांचा त्यांच्यावर विश्वास असून त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिल्यास ते  कारागृहाबाहेर येताच जमिनींची विक्री करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करतील.  दरम्यान, डीएसके मागील तीन वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे परत करू शकले नाहीत, तर सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाल्यावर ते पैसे कसे परत देऊ शकतील. त्यांचा अपघात झाल्यानंतर केवळ तीन दिवस ते रुग्णालयात हाेते. त्यामुळे दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात अाहे, असा सरकारी वकिलाने युक्तिवाद केला. 

 
डीएसकेंवर १३७४ काेटींचे बँक कर्ज 

डीएसकेंचे सध्या १२ गृह प्रकल्प कार्यरत हाेते. त्यापैकी केवळ एकाच प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित कामे अर्धवट अाहेत. अार्थिक गुन्हे शाखेकडे अातापर्यंत मुदत ठेवीच्या ६ हजार ६७१ गुंतवणूकदारांनी तक्रारी दिली असून त्यांची फसवणुकीची रक्कम ४४८ काेटी ७१ लाखांपर्यंत पाेहोचली अाहे. यापैकी ४१६ गुंतवणूकदारांनी तक्रार दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...