आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपळनेर-सटाणा मार्गावर डंपर-ट्रकमध्‍ये समोरासमोर भीषण धडक, दोन जण गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळनेर - पिंपळनेर-सटाणा रस्त्यावरील शेलबारी घाटात अपघाताची मालिका सुरूच असून आज शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता पुन्हा डंपर व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली.  यामध्‍ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सुब्रमणी अलकलम  (50) व शेक्तीबेल के सुरमुखम (48) असे जखमींचे नाव आहे. त्‍यांच्‍या हाता-पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ते दोघेही तामिळनाडूचे रहिवासी असल्‍याची माहिती आहे.

 

घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे कॉन्‍स्‍टेबल प्रशांत शिंपी, ग्यानसिंग पावरा, निलेश महाजन हे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व जखमींना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात त्‍यांच्‍यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्‍यांना धुळे येथे पाठविण्‍यात आले आहे.

 

पिंपळनेरहुन नाशिक कडे जाणारा डंपर (क्रं. MH 43 Y 9333) व सटाणा येथून पिंपळनेरकडे येणारा ट्रक क्रमाक (TN 52 N 3504) यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने दोन्‍ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डंपरमध्ये वाळू तर ट्रकमध्ये टमाटा कॅरेट भरलेले होते. अपघातामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच बघ्‍यांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.


शेलबारी घाट बनले अपघाताचे क्षेत्र
काल दिनांक 12 रोजी याच ठिकाणी कंटेनर व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना धुळे येथे पाठविण्यात आले असता त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान शेलबारी घाटात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटना सातत्याने घडत असून शेलबारी घाट अपघाताचे क्षेत्र बनले आहे. गेल्या 3 दिवसंपासून पिंपळनेर व परिसरात पावसाची संततधार सुरू असून अनेक अपघात वाहने घसरल्याने झाल्याचे दिसून आले आहे. त्‍यामुळे अपघात टाळण्यासाठी दिशादर्शक फलकांसह सूचनाफलक या घाटात बसविणे आवश्यक आहे.


पुढील स्‍लाइडवर पाहा, अपघाताचे भीषण फोटोज... 

 

 

बातम्या आणखी आहेत...