आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा जिल्ह्यात कोयना, पाटण परिसरात 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/कोल्हापूर- सातारा जिल्ह्यात कोयना, पाटण परिसरात 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसल्याचे हवामान शास्त्र विभागाने म्हटले आहे. तर सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून याची तीव्रता 3.2 असल्याचे सांगण्यात आले. सकाळी 11 वाजून 36 मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनेपासून 29.6 किमी अंतरावरील वारणा खोऱ्यात जावळे गावापासून दक्षिणेला 10 किमी अंतरावर असल्याचे सांगण्यात आले. केंद्र बिंदूची खोली हवामान विभागाने 10 किलोमीटर तर सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून  14 किमी असल्याचे सांगण्यात आले.

 

 

भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर अनेकांनी घरातून बाहेर पडून मोकळ्या जागी धाव घेतली. या परिसरात सातत्याने भूकंपाचे सौम्य धक्के बसत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भूकंपामध्ये कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाल्याचे वृत्त प्राप्त झालेले नाही. आसाम येथेही 5.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला असून तेथे कोठेही जीवितहानीचे झाल्याचे वृत्त मिळालेले नाही.

 

 

पुढील स्लाईडवर भारतीय हवामानशास्त्र विभागाने ट्विट केलेले छायाचित्र

 

 

 

बातम्या आणखी आहेत...