आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कोंढवा परिसरातील ब्रम्हा मॅजेस्ट्री या उच्चभ्रू रहिवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत तरूणाने आत्महत्या केली. आशिष विलास कामटे (वय 21) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. आज सकाळी आकराच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत आशिष हा सिंहगड कॉलेजमध्ये इंजिनिअरींगच्या दुस-या वर्षात शिकतो. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पंचनामा करण्यात आला. 

 

आशिषने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

बातम्या आणखी आहेत...