आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंधन दरवाढीला कंटाळून शेतकर्‍याने विकली Bike; घोड्यावरुनच घरोघरी पोहोचवतोय दूध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस होत असलेल्या वाढीमुळे सामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोलच्या किमती कमी करण्याबाबत सरकार ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. मात्र, मुरबाडमधील एका दूध विक्रेत्याने इंधनदरवाढीला कंटाळून नामी शक्कल लढवली आहे. त्याने आपली बाईक विकून चक्क घोडा खरेदी केला आहे. आता तो याच     घोड्यावरुनच दूध घरोघरी पोहोचवतो.

 

मुरबाडमधील धसई गावातील पांडुरंग विशे या दूध विक्रेत्या शेतकर्‍याने शेतीला जोडधंदा म्हणून चार म्हशी विकत घेतल्या. या म्हशींपासून मिळणारे दूध घेऊन तो मोटार सायकलवरून आजूबाजूच्या वाडया-वस्त्यांवर पोहोचवत होता. परंतु गेल्या दोन वर्षांपासून पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने दूध विक्रीतून मिळणारे पैसे पेट्रोलवरच खर्च होत होते. या महागाईला कंटाळून विशे यांनी आपली मोटारसायकल 22 हजार 550 रुपयांना विकली व थेट जुन्नर बाजार गाठला. तेथे त्यांनी 25 हजार रुपयांचा घोडा विकत घेतला. गेल्या महिनाभरापासून तो या घोडयावरच दूधाच्या किटल्या अडकावून दूध पोहोचविण्याचे काम करत आहे.

 

कार्यक्रमालाही घोड्यावरुनच लावतात हजेरी
पांडुरंग विशे नातेवाईकांकडे लग्नसमारंभ तसेच अन्य कार्यक्रमांनाही घोडय़ावर स्वार होऊनच हजेरी लावतात. त्यांची ही आगळीवेगळी अदा सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून महागाईवर त्यांनी लढवलेली शक्कल कौतुकाचा विषय ठरत आहे. 


पुढील स्लाईडवर पाहा घोड्यावरुन दूध विक्री करणार्‍या पांडुरंग विशे यांचे काही फोटोज....

 

बातम्या आणखी आहेत...