आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांनीच केले 5 महिन्‍याच्‍या बाळाचे अपहरण, कारण अस्‍पष्‍ट; आई आहे मनोरुग्‍ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-  देहूरोड येथे रायगडमधून अपहरण झालेल्‍या बाळाची 6 नोव्‍हेंबररोजी पोलिसांनी सुखरुप सुटका केली होती.  मात्र बाळाच्‍या वडिलांनीच त्‍याचे अपहरण केल्‍याचे आता समोर आल्‍याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. वडिलांनी असे का केले? हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्‍या हे बाळ पुण्‍यातील खासगी रुग्‍णालयात सुखरुप असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, देहूरोड येथील माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशर यांना रायगड येथील 5 महिन्‍याच्‍या चिमुकल्‍याचे अपहरण करुन त्‍याला देहूरोड येथील थॉमस कॉलनीतील एका कुटुंबात ठेवण्‍यात आल्‍याची माहिती 6 नोव्‍हेंबररोजी मिळाली. त्‍यांनी ताबडतोब या घटनेची माहिती देहुरोड उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणपतराव माडगुळकर यांना दिली. पोलिसांनी तातडीने पावल उचलत संबंधित ठिकाणी चौकशीसाठी गेले असता त्‍या ठिकाणी त्‍यांना ते बाळ आढळून आले. नंतर पोलिसांनी बाळाला ताब्‍यात घेऊन घरातील सदस्‍यांनाही चौकशीसाठी ताब्‍यात घेतले. अखेर चौकशीमध्‍ये या कुटुंबियांनी बाळाच्‍या वडिलांनीच आपल्‍याकडे बाळ सुपुर्द केल्‍याचा खुलासा केला आहे.


याप्रकरणी देहुरोडच्‍या तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक दिपाली बोरकर यांनी माहिती दिली आहे की, हे बाळ रायगड जिल्‍ह्यातील कोलाड या गावाचे असून त्‍याच्‍या जन्‍म दाखल्‍यावर दत्‍ता बाळकृष्‍ण मासूक असे नाव आढळून आले आहे. गावात चौकशी केली असता आई मनोरुग्‍ण असल्‍याचे आढळून आले आहे. हे मुल तिच्‍या पहिल्‍या पतीचे आहे. तिच्‍या दुस-या 68 वर्षीय पतीचे निधन झाले आहे. महिलेच्‍या पहिल्‍या पतीनेच हे मुल देहुरोडमधील कुटुंबाकडे दिले होते. मात्र याची कोणतीच कल्‍पना महिलेच्‍या कुटुंबातील इतर सदस्‍यांना दिली गेली नव्‍हती. त्‍यामुळे बाळाचे वडिल व देहुरोडमधील सं‍बंधित कुटुंबावर अपहरणाचा गुन्‍हा दाखल करण्‍याचे काम सुरु आहे. काही तांत्रिक बाबींमुळे अद्याप त्‍यांना अटक करण्‍यात आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...