आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलगा व्हावा म्हणून 46 वर्षीय शिक्षकाचे 19 वर्षीय युवतीशी लग्न, 15 जणांवर गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवड मधील सांगवी येथे 19 वर्षीय  युवतीचा उस्मानाबादमधील 46 वर्षीय शिक्षकासोबत जबरदस्तीने विवाह लावून दिल्याने पीडित तरुणीने आई वडिलांसह सासरच्या मंडळीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईवडिलांसह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवी सांगवी परिसरात राहणा-या एका 19 वर्षीय युवतीच्या आईवडिलांनी तिचे लग्न उस्माबाद जिल्हापरिषेदत शिक्षक असलेल्या उत्तम विठ्ठल काळे याच्याशी जमवले होते. पण पीडित युवतीचा या विवाहास विरोध होता. उत्तमने पीडितेच्या आईवडिलांना पुण्यात फ्लॅट घेऊन देण्याचे तसेच कर्ज फेडण्याचे आमिष दाखवले होते. उत्तमला 14 वर्षांची एक मुलगी असून, त्याला मुलगा हवा होता त्यासाठी तो दुसरे लग्न करणार होता. पीडितेच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी तिचे जबरदस्तीने 22 मार्च रोजी उत्तमशी लग्न लावून दिले.  आईवडिलांच्या धमकीमुळे ती शांत होती. पीडितेने उस्मानाबादला नांदायला गेल्यानंतर पोलिस ठाणे गाठले आणि आपली करुण कहाणी पोलिसांना सांगितली. उस्मानाबाद पोलिसांनी तिला सांगवी येथे आई वडिलांकडे सोडले मात्र त्यांनी देखील तुला नांदावच लागेल अशी धमकी दिली त्यामुळे तिने थेट सांगवी पोलीस ठाणे गाठत आई वडिलांसह सासरच्या 15 जणाविरोध तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पाच जणांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस सांगवी च्या पोलीस उपनिरीक्षक एम,टी शिंदे या करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...