आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरीत एचए काॅलनीत महिलेवर बाईकवरुन आलेल्या इसमांनी केला गोळीबार, थोडक्यात बचावली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी-चिंचवड-  हिंदुस्थान अँटिबायोटिक वसाहतीत शनिवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास एका महिलेवर दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी गोळीबार केला यात महिला बचावली असून घटनेत कोणीही जखमी नाही. घटनास्थळी पिंपरी पोलीस दाखल झाले असून तपास सुुरु केला आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार,शीतल सिकंदर वय-३५ रा.गांधीनगर पिंपरी, यांचा मुलगा दहावीत पास झाला याचाच आनंद द्विगुणित करण्यासाठी हिंदुस्थान अँटिबायोटिक वसाहतीतील कॅंन्टीन मध्ये पेढे घेण्यासाठी शीतल आणि आणखी एक महिला आल्या होत्या. त्यावेळी पल्सर  दुचाकीवरून आलेल्या एकाने शीतल यांच्या दिशेने गोळीबार केला मात्र यात त्या बचावल्या असून सुखरूप आहेत. या घटनेचा तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...