आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या \'त्या\' कुटुंबावर अंत्यसंस्कार, आई आणि मुलाला एकाच चितेवर दिला अग्नी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड- पुणे सोलापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघात पिंपरी चिंचवड मधील 5 जणांचा जागीच मृत्यू झल्याची घटना शुक्रवारी घडली. घटनेनंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात शोकाकुल पसरला आहे.  भिगवण अपघातात जीव गमावलेल्या गायकवाड कुटुंबीयांच्या दुःखात यमुनानगरचे नागरिकही शोकसागरात बुडाले आहेत. गायकवाड कुटुंबीयांतील मृत्यूमुखी पडलेल्या पाचही जणांचे मृतदेह शनिवारी सकाळी यमुनानगर येथील घरी आणण्यात आल्यानंतर त्यांच्यावर आज निगडी येथील स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 

प्रकाश रामचंद्र गायकवाड (वय 67), सुनीता प्रकाश गायकवाड (वय 58), संदीप प्रकाश गायकवाड (वय 40), शीतल संदीप गायकवाड (वय 32), आभिराज संदीप गायकवाड (वय 5, सर्वजण रा. रा. नाना-नानी पार्क यमुनानगर निगडी अशी या अपघातात मृत्यू झालेल्या गायकवाड कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. या अपघातात गायकवाड परिवारातील प्रमोद प्रकाश गायकवाड (वय 30) व हेमलता प्रमोद गायकवाड( वय 28) हे आणखी दोघे जण जखमी झालेले आहेत. त्यापैकी हेमलता गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

 

मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये शीतल गायकवाड आणि त्यांचा पाच वर्षांचा मुलगा अभिराज यांचा समावेश असल्याने दोघा मायलेकरांचा एकाच चितेवर अत्यंसंस्कार करण्यात आला. यावेळी निगडीतील हजारो नागरिक उपस्थित होते. हृदय पिळवटून टाकणारा हा प्रसंग पाहून लोकांचे डोळे पाणावले. 

 

बातम्या आणखी आहेत...