आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात..टायर फुटून स्काॅर्पियो उलटली; 5 जागीच ठार, 2 गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सोलापूर- पुणे महामार्गावर इंदापूर तालुक्यातील डाळज गावाजवळ पुण्याकडे जाणारी  स्काॅर्पियो (एम. एच 20. एजी 0939) टायर फुटल्याने समोरून येणार्‍या एका वाहनाला धडकली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता घडला. 

 

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग व भिगवण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना भिगवण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघामुळे काही  महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मृत व जखमींची मात्र नावे अद्याप कळू शकली नाहीत. अपघातग्रस्त सर्वजण तुळजापूरवरुन पुण्याला निघाले होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो..

बातम्या आणखी आहेत...