आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PUNE रेल्वे स्टेशनवरुन मुलीचे अपहरण, सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले कृत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- रेल्वे स्टेशनवरुन एका पाच वर्षांच्या मुलीचे अज्ञात महिलेने अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेचे हे कृत्य स्टेशनवरील फलाटावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमरे-यात कैद झाले आहे. हा प्रकार 21 मे रोजी घडला असून पोलिसांनी मुलीच्या आई वडिलांच्या तक्रारीवरुन शोध सुरु केला आहे. 

 

उषा आणि   जयसिंग चव्हाण हे नागपूरवरून रोजगाराच्या शोधात पुण्यात आले होते. स्टेशन बाहेरील दर्ग्याजवळ हे कुटुंब थांबलं होतं. पुणे स्टेशनच्या आवारातील दर्ग्यासमोर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांची पाच वर्षांची मुलगी जयश्री आपल्या भावासोबत खेळत होती. त्यानंतर काही वेळाने ती दिसेनासी झाली. संबंधित मुलीच्या वडिलांनी रेल्वे स्टेशन परिसरात तिचा शोध घेतला परंतू ती आढळली नसल्याने लोहमार्ग पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. दरम्यान, रेल्वे स्टेशनमध्ये असलेल्या कॅमे-यात हा प्रकार कैद झाला असून एक महिला या मुलीच्या हाताला धरून तिला घेऊन जात असल्याचे दिसत आहे. याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी अपहृत मुलीचा शोध सुरू केला आहे.  

 

पुढील स्लाईडवर पहा अपहरणाचे सीसीटीव्ही फुटेज...

बातम्या आणखी आहेत...