आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या गाडीला शिरूरजवळ अपघात; ट्रकला मागील बाजूने धडकली कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरूर- माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या गाडीला शुक्रवारी रात्री नऊ वाजून 50 मिनिटांनी नगर रस्त्यावरील चौफुला येथील हॉटेल कल्याणी समोर भीषण अपघात झाला. सुदैवाने या घटनेत ते थोडक्यात बचावले आहेत. या गाडीत पाचपुते यांच्याबरोबर त्यांचे सहाय्यक यशवंत भोसले आणि चालक युवराज उबाळे होते. तिघेही सुखरूप आहेत. 

 

अपघातात पाचपुते यांची कारने मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला मागील बाजूने धकड दिली. शिरुरजवळ कानीफनाथ फाटा परीसरात हा अपघात झाला. या अपघातात पाचपुतेंच्या कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. परंतु, सुदैवाने पाचपुते यांना कुठलीही ईजा झाली नाही. पाचपुते यांच्यासह चालकानं सीट बेल्ट लावल्यानं मोठा अनर्थ टळला, अपघातानंतर पाचपुते पुण्याकडे रवाना झाले. अपघाताची माहिती मिळातच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली पाचपुते यांची विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला.

 

पुढील स्लाइडर पाहा अपघाताचे फोटो....

बातम्या आणखी आहेत...