आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प. बंगालची वाघीण असेल पुढची पंतप्रधान, माजी खासदार राम जेठमलानी यांचे भाकीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘वकिलीची पदवी घेताना मिळवलेले वर्गातले शिक्षण आणि न्यायालयात प्रत्यक्ष उपयोगात आणले जाणारे ज्ञान यात अंतर पडले आहे. त्यामुळे वकिलीची सनद घेतलेला विद्यार्थी लगेच न्यायालयात उभा राहू शकत नाही. शिक्षणातील ही त्रुटी दूर करून सनद आणि व्यावहारिक ज्ञान यांची सांगड घालण्याची गरज आहे’, असे अावाहन राज्याचे महाधिवक्ता (अॅडव्होकेट जनरल) अॅड. आशुतोष कुंभकोणी यांनी रविवारी केले.   

 

तर ज्येष्ठ विधीज्ञ व माजी खासदार राम जेठमलानी यांनी पंतप्रधान नरेंद माेदींवर टीका करून पुढच्या वेळी ‘बंगालची वाघीण’ देशाचे नेतृत्व करेल,’ असे भाकितही वर्तवत त्यांनी ममता बॅनर्जींच्या नावाचे संकेत दिले. सिम्बायोसिस लॉ स्कूलतर्फे विधी दिनानिमित्त आयोजित  ‘न्यायिक पद्धतीतील सुधारणा’ या विषयावरील व्याख्यानात  बोलत होते.  संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार,  लॉ स्कूल संचालिका शशिकला  गुरपूर तर अध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ माजी खासदार राम जेठमलानी उपस्थित होते.

 

अॅड. कुंभकोणी म्हणाले,‘वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्न रुग्णालये असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्वरित आपले ज्ञान पडताळता येते. त्याच धर्तीवर विधी महाविद्यालय हे न्यायालये, न्यायाधिकरणाशी संलग्न असले पाहिजे. कायद्याच्या विद्यार्थ्यांना आपले ज्ञान पडताळण्याची सुविधा मिळायला हवी. त्यामुळे सनद घेतल्यावर विद्यार्थी त्वरित न्यायालयात उभे राहून काम करू शकतील.’

 

‘माेदींना सत्ता देणे ही जनतेची घाेडचूकच’
अध्यक्षपदावरून बोलताना  अॅड. जेठमलानी म्हणाले,‘ मोदी यांना सत्ता देऊन घोडचूक केल्याचे जनतेच्या आता लक्षात आले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पायउतार होतील. बहुधा ते देशाबाहेर जातील. मोदींची लाट होती, हे मान्य करावे लागेल मात्र गेल्या चार वर्षांतील त्यांचा अनुभव पाहता, जनता पुन्हा ती चूक करणार नाही.

बातम्या आणखी आहेत...