आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसा नर्सरीत काम अन‌् रात्री कारमध्ये येऊन घरफाेड्या; चार जणांच्या टाेळीकडून 14 गुन्हे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुणे-मुंबई महामार्गावरील साेमाटणे फाटा परिसरात दिवसा नर्सरीत काम करून  रात्री कारमध्ये पुण्यात येऊन विविध भागात गेल्या तीन वर्षांपासून घरफाेड्या करणाऱ्या चौघांच्या टाेळीला अटक करण्यात पाेलिसांना यश अाले अाहे. याप्रकरणी अाराेपींसह चाेरीचे साेने विकत घेणारा कारागीर यांना अटक करून त्यांच्याकडून २५ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी १४ गुन्हे उघडकीस अाणले अाहेत. 


जगशी मंगा बुटीया, राकेश उर्फ राजेश पाेपट वाघमारे, भरत विरजी बुटीया, जयंती केशव बुटीया  अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चाेरीचे साेने विकत घेणारा बंगाली कारागीर शंकर सुफलचंद्र बारुई (३९, मु.रा.कलकत्ता) याला तळेगाव दाभाडे येथून अटक करण्यात अाली. १२ फेब्रुवारी राेजी पहाटे सव्वातीनच्या  सुमारास पोलिसांना एक कार संशयिरित्या  फिरत असल्याचे निदर्शनास आले. या वेळी पोलिसांनी त्यांच्या कारची तपासणी केली असता त्यात घरफोडीचे साहित्य आढळले. दरम्यान, आरोपींची चौकशी केली असता आपण सर्वजण दिवसा नर्सरीत काम करायचे.  त्यानंतर रात्री कारमध्ये पुण्यात जाऊन घरफोडी करत असल्याची कबुली त्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...