आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे- मोशीत गुजरातवरुन आणलेला कोट्यावधींचा गुटखा पकडला, चार जण ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवड मधील मोशी परिसरात पोलिसांनी गुटख्याच्या पोत्यांनी भरलेले चार ट्रक जब्त केले आहेत. ही कारवाई शुक्रवारी पहाटे करण्यात आली. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या गुटख्याची किंमत करोडोंमध्ये असल्याचे बोलले जात आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी हा माल जप्त केला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. यामध्ये अजून काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे. 

 

आळंदी येथील गुटख्याच्या व्यापारी पंकज बलदोटा व बोरु्ंदीया या दोघांचा माल असून हा गुटखा गुजरात येथून पुणे जिल्‍हा व शहरात विकण्यासाठी आणला जात होता. ही कारवाई गुन्हे शाखेच्या अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने व अन्न व औषध प्रशासननाच्या अधिकार्‍यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...