आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्किमरच्या सहाय्याने कार्ड क्लाेनिंग करुन फसवणूक करणारी परदेशी नागरिकांची टाेळी जेरबंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील पंजाब नॅशनल बॅंकेच्या पाषाण शाखा येथील एटीएमला दिवाळीच्या सुमारास स्किमर बसवून, दाेन महिन्यानंतर कार्ड क्लाेनिंगद्वारे नागरिकांच्या चाेरलेल्या बॅंक खात्याच्या माहितीवरुन बनावट एटीएम कार्ड बनवून वेगवेगळया एटीएम मधून पैसे काढणाऱ्या टाेळीस पाेलीसांनी वसर्इ येथे जेरबंद केले अाहे. अटक करण्यात अालेले तीन अाराेपी हे रुमानिया देशाचे रहिवासी असून पर्यटन व्हिसावर भारतात येऊन त्यांनी तब्बल 1030 नागरिकांची गाेपनीय बॅंक माहिती चाेरल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाले अाहे. 

 

इरिमा ड्रेगाॅस जुनेट (वय-26), लाझर अलिन क्रेस्टी (22) व बॅलन फ्लाेरिया क्रिस्टीनेल (44, सर्व रा.रूमानिया) अशी याप्रकरणी अटक करण्यात अालेल्या अाराेपींची नावे अाहेत. न्यायालयात अाराेपींना हजर केले असता 28 डिसेंबर पर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्याचे अादेश देण्यात अाले अाहे. पाेलीसांनी अाराेपींच्या ताब्यातून क्लाेन (बनावट) एटीएम कार्ड 54, एक स्किमर, दाेन लॅपटाॅप, तीन माेबार्इल तसेच राेख दाेन लाख 44 हजार रुपये मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पाेलीस उपअायुक्त गणेश शिंदे यांनी दिली. 

 

पाषाण येथील पंजाब नॅशनल बॅंकेच्या खातेधारकांच्या खात्यातून 11 डिसेंबर पासून परस्पर बेकायदेशीररित्या बेंगलाेर, कर्नाटक येथून एटीएम द्वारे अनाधिकृतरित्या पैसे काढल्याच्या तक्रारी खातेधारकांकडून बॅंकेकडे येऊ लागल्या. त्यानुसार बॅंकेचे मॅनेजर माेहम्मद अाजाद हुसेन यांनी याबाबत चतुश्रृंगी पाेलीस ठाण्यात अज्ञात अाराेपीं विराेधात तक्रार दाखल केली. पाेलीसांनी तपास सुरु केला असता, अाॅक्टाेबर महिन्यात ज्या ज्या बॅंक खातेदारांनी पाषाण येथील बॅंकेच्या एटीएम सेंटर मध्ये कार्डद्वारे ट्रान्झॅक्शन केलेले हाेते, त्याच खातेदाराकांच्या खात्यातून बनावट एटीएम कार्डच्या अादारे बेंगलाेर येथुन पैसे काढले जात असल्याचे निष्पन्न झाले.

 

त्यानुसार एपीअाय दत्तात्रय शिंदे यांचे एक पथक बंगेलार येथे तपासाकरिता गेले. मात्र, 16 डिसेंबरला बेंगलाेर येथील अाराेपींनी पैसे काढण्याचे थांबवले. त्यानंतर 18 डिसेंबर पासून वसर्इ येथुन पैसे काढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे एपीअाय संजय ठेंगे यांचे पथक सदर ठिकाणी गेले. तसेच बेंगलाेर येथील पथकही मुंबर्इ जवळील वसर्इ येथे येऊन दाेन्ही पथकांनी अाराेपींचा शाेध सुरु केला. तांत्रिक माहितीच्या अाधारे अाराेपींचा माग काढत अाराेपींना पाेलीसांनी ताब्यात घेतले. 

 

890 बॅंक खातेधारकांची फसवणूक राेखली-

 

चतुश्रृंगी पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक दयानंद ढाेमे यांनी सांगितले की, अाराेपींनी सुमारे 1030 नागरिकांची बॅंक विषयक गाेपनीय संवेदनशील माहिती पंजाब नॅशनल बॅंक, पाषाण येथील एटीएम वरुन अाॅक्टाेबर 2017 मध्ये चाेरली. त्यानंतर  सदर माहितीच्या अाधारे नवीन बनावट एटीएम कार्ड अाराेपींनी बनवून बेंगलाेर व वसर्इ येथूून विविध एटीएम मधून पैसे काढून अपहार केला. सदर अाराेपींनी अातापर्यंत 138 नागरिकांची फसवणुक केली असून अाराेपी अटक झाल्यामुळे 890 बॅंक खातेधारकांची फसवणुक हाेण्यापासून राेखली अाहे. डिसेंबरच्या शेवटच्या अाठवडयात अाराेपी पुन्हा रुमानियाला जाणार हाेते अशी बाब चाैकशीत समाेर अाली अाहे. 
 

बातम्या आणखी आहेत...