आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र याच सोशल मीडियामुळे फसवणुकीचे प्रकार देखील वाढत असल्याचे दिसत आहे. पिंपरी-चिंचवडमधील महिला डॉक्टरला फेसबुक मित्राने तब्बल 41 लाख 82 हजार रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. प्रतिभा शामकुवर (वय-55, रा. फुगेवाडी) या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बाल रोग तज्ञ आहेत.गेल्या 28 वर्षांपासून त्या या ठिकाणी काम करतात. डॉ.प्रतिभा यांची फेसबुकवर माईक नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली होती. तो देखील डॉक्टर असल्याचे प्रतिभा यांना भासवले आणि तो अमेरिकेत असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर मी चॅरिटीच काम करतो, असे म्हणत डॉ. प्रतिभा यांचा विश्वास संपादन केला. काही दिवस फेसबुकवर या दोघांच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि यांच्यात मैत्रीचे नात निर्माण झाले. 13 डिसेंबर 2017 रोजी आणि 11 जानेवारी 2018 दरम्यान अमेरिकेवरून महागडे पार्सल पाठविल्याचे सांगून ते दिल्ली येथील कस्टम ऑफिसर आणि आर.बी.आय या ऑफिसमधून बोलणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवरून स्वतःच्या बँक खात्याचा नंबर पाठवून बिहार आणि दिल्ली येथील बँकेत पैसे पाठविण्यास सांगितले. तसेच डॉ.प्रतिभा यांनी 41 लाख 82 हजार रुपये भरले. त्यानुसार भोसरी पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.