आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीने काढली चक्क मोटारसायकलची अंत्ययात्रा, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी-चिंचवड- पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसने चक्क मोटारसायकलची अंत्ययात्रा काढली. अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या मोदी सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने दिली. चिंचवड लिंक रोड ते मोरया गोसावी चौक मंदिरापर्यंत मोटारसायकलची अनोखी अंतयात्रा काढून राष्ट्रवादीने निषेध नोंदवला.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, प्रवक्ते फजल शेख, नगरसेविका अपर्णा डोके, माजी नगरसेवक निलेश पांढरकर, राजेंद्र साळुंके, युवा नेते विजय गावडे, विशाल काळभोर, अलोक गायकवाड आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...