आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरीत अर्ध्या रात्री टोळक्याचा धुडगूस, रस्त्यावर उभी वाहन फोडत केले तिघांवर वार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच असून मंगळवारी रात्री 11 सुमारास नेहरुनगर, विठ्ठलनगर वाकड परिसरामध्ये अज्ञात टोळक्याने 10 ते 12 वाहनांची काचा फोडून नुकसान केले. तसेच नेहरू नगर मध्ये  तीन जणांवर वार  केल्याची घटना घडली आहे.  या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या आलेल्या काही अज्ञात टोळक्यांनी हातात शस्त्रे घेवून दहशत माजवत गणेश रामदास नेरकर (वय ३२, रा. नेहरू टॉवर, नेहरूनगर पिंपरी) या तरुणावर कोयत्याने वार केले. यानंतर विठ्ठल नगर झोपडपट्टी पुनर्वसन येथे कामावरून घरी चाललेल्या संभाजी म्हस्के या तरुणावर देखील कोयत्याने वार केले. नेहरूनगर चौकात देखील आणखी एकाला मारहाण केली.  तसेच नेहरूनगर येथील क्रांती चौक, संतोषी माता चौक, विठ्ठल नगर झोपडपट्टी पुनर्वसन इमारत या ठिकाणी रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा, टेम्पो, कार एकूण  १० ते १२ वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोर शहरातील वाकड येथे काळखडक रस्त्यावर उभी असलेल्या वाहनाची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती कळताच पोलीस प्रशांसानाचा मोठा बंदोबस लावण्यात आला. मात्र अद्याप दोन्ही घटनांमध्ये कुणालाही ताब्यात घेण्यात आले नाही. 

बातम्या आणखी आहेत...