आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सडके आंबे, त्यांना भाजपात आणू नका : गिरीश बापट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- एक सडका आंबा,सगळे आंबे सडवतो.त्यामुळं  राष्ट्रवादी काँग्रेसमधील सडके आंबे भाजपमध्ये आणून, आपले आंबे खराब करू नका. अशी टीका पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांनी केली. तर शिवसेना भाजपचा मित्र पक्ष असल्याने त्यांचे कार्यकर्ते भाजपात आले तर येऊ द्या. असे म्हणत शिवसेनेचे कार्यकर्ते फोडा असा अप्रत्यक्ष सल्लाच बापट यांनी दिला. ते मावळ मधील कार्ला येथे शिवसेनेतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. 

 

राष्ट्रवादीमधील कार्यकर्ते आणू नका शिवसेनेतील कार्यकर्ते येऊ द्यात तो आपला मित्र पक्ष आहे. राष्ट्रवादीमधील एक सडका आंबा,सगळे आंबे सडवतो.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सडके आंबे भाजपमध्ये आणून आपले आंबे सडवू नका. अशी टीका पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांनी केली आहे. तर हल्लाबोल सारख्या कार्यक्रमांनी महाराष्ट्रातील जनता फसणार नाही.जनतेला प्रत्यक्ष काम कोण करत हे माहीत आहे.त्यामुळे भविष्यात भाजपच्या नेतृत्वात काम करेल ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो अस बापट म्हणाले. भारतीय जनता पार्टी पक्ष नसून एक कुटुंब आहे.याचा अनुभव शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना येईलच. तुम्ही आता या कुटुंबाचा आला आहात तुमचं दुःख ते आमचं असेल. इतके संवेदनशील राहू अस बापट म्हणाले. राज्यात भारतीय  जनता पार्टी वाढविण्याचा प्रयत्न करू. मावळ मधील मातीने मला मोठं केलं आहे,याची जाणीव आहे अस बापट म्हणाले. यावेळी मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...