आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा, मंत्री गिरीश बापटांनी आतापर्यंत उधळलेली मुक्ताफळे, हिरवा देठ ते ठेवलेली बाई...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणेकर असलेले 70 वर्षीय गिरीश बापट रोखठोक व स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. - Divya Marathi
पुणेकर असलेले 70 वर्षीय गिरीश बापट रोखठोक व स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

 पुणे- राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. आपलं सरकार डिसेंबरपर्यंत आहे. पुढं कोणतं सरकार येईल हे आता सांगू शकत नाही. पण आपली जी काही कामे असतील ती करून घ्या असे धक्कादायक वक्तव्य पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार आणि बापटविरोधक मानले जाणा-या संजय काकडे यांनी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत निर्णय घ्यावा असे म्हटले आहे, तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही बापटांना चार खडे बोल सुनावले आहेत. एकीकडे भाजपात बापट यांच्या वक्तव्याची चिरफाड होत असताना विरोधकांनीही भाजपवर शरसंधान साधण्याची संधी सोडली नाही. खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांनी बापट खरे बोलून गेले असे म्हटले आहे.

 

पण पुणेकर असलेले 70 वर्षीय गिरीश बापट हे काही पहिल्यांदाच असे काही बरळले नाहीत. यापू्र्वीही त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करून आपल्या पक्षाला आणि सरकारला अडचणीत आणण्याचे काम केले आहे. आज यानिमित्त आपण त्यांनी गेल्या तीन वर्षात काय काय वादग्रस्त वक्तव्य केली ते पाहणार आहोत.

 

पुढे स्लाईडद्वारे वाचा व पाहा, गिरीश बापट यांनी आतापर्यंत काय काय मुक्ताफळे उधळली आहेत....

बातम्या आणखी आहेत...