आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंच्या अनुभवाचा सरकारला फायदाच, मंत्रीपदाबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील- गिरीश महाजन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भोसरी भुखंड प्रकरणात नुकतीच क्लिनचीट मिळाली आहे त्यामुळे आनंदच आहे शिवाय खडसे यांच्या राजकारणातील अनुभवाचा सरकारला फायदाच होणार आहे मात्र खडसेंच्या मंत्रीपदाबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील.राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांच्या मंत्रीमंडळातील पुनरागमानाबाबत भुमिका स्पष्ट केली. 

 

पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना महाजन यांनी सांगितले की लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात अहवाल सादर केला आहे. एकनाथ खडसेंना मंत्रीमंडळात घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असून, खडसे हे अनुभवी नेते आहेत. यापूर्वी विरोधी पक्षनेते म्हणूनही तर भाजप सरकारमध्ये मंत्रीही म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्याने ते मंत्रीमंडळात आले तर त्याचा सरकार आणि भाजपला फायदा होईल. विरोधकांचे काम विरोध करणे त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा करू शकते नाही अशी टीका विरोधकांवर करतनाच छगन भुजबळ यांचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही असेही ते म्हणाले. कॅांग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळातच त्यांची चौकशी सुरू होती. त्यामुळे आमच्या सरकारने त्यांना आत टाकले नाही आणि बाहेरही काढले नाही. असे महाजन यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...