आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन बनवला व्हिडिओ, कामाला न आल्यास दिली व्हायरल करण्याची धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- नोकरी देण्याच्या बहाण्याने पार्लर मालकाने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन मोबाईलवर व्हिडिओ तयार केला. मुलीने कामावर येण्यास टाळले असता तिला हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पार्लर विरोधात पास्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत 16 वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी सराफत बरकतअल्ली खान (वय 24) याचे वाकड येथे पार्लर आहे. त्याला दुकानात कामासाठी दोन मुली पाहिजे होत्या. पीडित मुलगी तेथे कामाला गेली, आरोपीने तुझे ट्रायल घ्यावे लागेल, असे म्हणत तिला पार्लरवरील कंपार्टमेंटमध्ये नेऊन फेशिअल करायला लावले. यावेळी त्याने एका ठिकाणी मोबाइल लपवून ठेऊन रेकॉर्डिंग केले. फेशिअल करत असताना आरोपीने पीडितेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

 

त्याच्या या धमकीला घाबरलेली मुलगी कामावर जायला तयार नव्हती. पण तो तिला कामावर येण्यासाठी बळजबरी करु लागला. या प्रकारामुळे ती प्रचंड तणावात असल्याने तिने दोन दिवसांपूर्वी घर सोडले. तिच्या घरच्यांनी तिचा शोध सुरु केला. त्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. पोलिंसात तक्रार दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...