आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात उबेर कॅब चालकाकडून तरुणीचा विनयभंग, घटनेनंतर आरोपी कारसह फरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-उबेर कॅब चालकाकडून तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. कॅब चालकाने उशिरा आल्याच्या कारणावरून तरूणीला पकडून बाहेर काढत अश्लील कृत्य केले. हा प्रकार भर रस्त्यात घडल्याने खळबळ उडाली. 

 

पुण्यातील मध्यवस्तीत बाजीराव पुतळा परिसरात शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी उबेर कॅबच्या कार चालकावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून उबेर कॅबच्या चालकाचा शोध घेतला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...